महाराष्ट्रातील वने

Vision mpsc

   उष्ण कटी बंधिय सदाहरित अरण्ये 

महाराष्ट्रात कोकण भागात सह्याद्री च्या पायथालगत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीच्या परिसरात ही सदाहरित अरण्ये पहावयास मिळतात 

वार्षिक पर्जन्य 200 से. मी . पेक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात व जांभा मृदेच्या भागात या वृषांची उंची 45 ते 60 मी दरम्यान असते 

वृशांचे प्रकार .... नागचंपा, पांढरा सिडार, फणस , कावसी , जांभूळ इत्यादी वृक्ष आढळतात  व अधूनमधून बांबू व कळक यांचे विविध प्रकार आढळतात.


# उष्ण कटी बंधीय निम सदाहरित अरण्ये 

वार्षिक पर्जन्य 200 से .मी . पेक्षा कमी प्रदेशात निमसदहरित अरण्ये आढळतात ही अरण्ये सदाहरित व पांझडीची अरण्ये यांचा संक्रमण अवस्थेत असतात 
पश्चिम किनारपट्टीवर कोकणात त्यांचा एक सलग पट्टा पहावयास मिळतो 

सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर काही वनस्पती आढळतात विशेष आंबोली ,लोणावळा , इगतपुरी परिसरात निमसदहरीत अरण्ये आहेत 

वृक्षांचे प्रकार ... किंडल, रानफणास, नाना , कदंब , शिसम , बिबळा 
नीमसदहरित अरण्यातील वृक्षांचा आर्थिक दृष्ट्या बराच उपयोग होतो आईन , नाना , वावळी..

#. उप उष्ण कटी बांधिय सदाहरित अरण्ये ..

सह्याद्री पर्वतावर 250 से. मी. पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये पहावयास मिळतात ....
महाबळेश्वर , पाचगणी , माथेरान , व भीमाशंकर या परिसरात ही अरण्ये आहेत व उत्तर महाराष्ट्रात गाविलगड टेकड्यावरही ही अरण्ये पहावयास मिळतात .... 

या अरण्यात साधारणपणे     जांभळा , अंजन , हिरडा , अंबा , बेहडा , कारवी इत्यादी वृक्ष आढळतात.
अरण्यातील अनेक वृक्षांचा आर्थिक दृष्ट्या बराच उपयोग होतो.
मधुमक्षिका पालन हा येथील महत्वाचा लघु उद्योग धंदा आहे..

टिप्पणियाँ