सार्वजनिक काका यांचा जीवन काळ 1828 ते 1880. हा होता . हे महाराष्ट्रातील एकोणिसाव्या शतकातील निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते होते .
जोशी हे 2 एप्रिल 1870 ला पुण्यात स्थापन झालेल्या सार्वजनिक सभेचे प्रमुख संस्थापक व आधारस्तंभ होते.
त्यांनी स्वतःस या संस्थेचा कार्यात वाहून घेतले होते .
सार्वजनिक काका यांचा जन्म 9 एप्रिल 1828 रोजी सातारा येथे झाला . शिक्षण पूर्ण झाल्यास त्यांनी सरकारी नोकरीत प्रवेश घेतला नोकरी च्या निमित्ताने ते पुण्यास आले . पण जास्त काळ ते नोकरीत राहिले नाही त्यांनी नोकरी सोडली
1865 मध्ये त्यांनी वकिलीची परीक्षा दिली व पुण्यातच वकिलीचा व्यवसाय सुरू केला .
वासुदेव फडके यांचे वकीलपत्र त्यांनीच घेतले होते . पुण्यात ते कोणीच घेत न्हवते त्यांनी हे धाडस दाखवले .
'फडक्याला जसा फासावर चढवतात तसेच मला ही चाढवतील ' यापेक्षा काहीही करणार नाहीत ना असे त्यावेळेस ते म्हणाले
वासुदेव जोशी यांचा मूर्त्यू 25 जुलै 1880 ला झाला
जोशी यांचा सामाजिक कार्याचा उल्लेख करताना सार्वजनिक सभेचं उल्लेख होतो . सार्वजनिक सभा ही सनदशीर मार्गाने काम करणारी राजकीय संस्था होती .
पुणे येथील पार्वती संस्थानचा कारभार बराच गोंधळ व आर्थिक भ्रष्टाचार मजला होता त्यासाठी या सभेची स्थापना केली होती .
औंध चे राज्ये श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिध हे या सभेचे पहिले अध्यक्ष होते. व जोशी या सभेचे पहिले चिटणीस होते .
सार्वजनिक सभेची स्थापना एक मर्यादित उदेशने झाली असली तरी लवकरच तिला सामाजिक व राजकीय महत्व प्राप्त झाले. याचे श्रेय अर्थातच न्या.महादेव रानडे यांचाकडे जाते 1871 चा अखेरीस ते पुण्यात सरकारी अधिकारी म्हणून आले .
सार्वजनिक सभेचे राजकारण सनदशीर मार्गाचे होते अर्थातच इंग्रजांचा साह्याने येथे सुधारणा घडवून आणण्याच त्यांचा प्रयत्न होता तथापि सनदशीर मार्गाने येथील लोकांना संघटित करण्याचे काम केले
न्या रानडे यांचे मार्गदर्शन या सभेला लागले पण सभेचा कार्याची प्रमुख जबाबदारी जोशी यांचा कडे होती .
सार्वजनिक सभेला नावारूपाला आणण्यासाठी या दोघांचाही प्रमुख वाटा होता .
या सभेच्या साह्याने येथील जनतेच्या अडचणी व गाऱ्हाणी सरकार पर्यंत पोहचवण्याची काम या सभेने केली . व 1873 ला या सभेनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक पाहणी केली येथील शेतकऱ्यांवर या आर्थिक पाहणीचा व त्यांचा दुरवस्थेवर खूप उपयुक्त ठरली .
दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांसाठी या सभेचे मोलाचे कार्य
1876- 77 ला महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता सामान्य माणसावर अक्षारस उपास मारीची वेळ आली होती . अशा वेळी या सभेने खूप मदत केली .
1877 ला इंगलंड ची राणी व्हिकटरिया हिला ' हिंदुस्तान सम्राज्ञी ' ही पदवी बहाल केली . त्या वेळी दिल्ली येथे दरबार भरविला त्यावेळी सार्वजनिक सभेने एक मानपत्र बहाल केले . ते मानपत्र दिल्ली का घेवून स्वत सार्वजनिक काका गेले होते .
या मानपत्र हिंदी लोकांना ब्रिटिश राष्ट्र प्रमाणे दर्जा द्यावा अशी मागणी होती . ब्रिटिश पार्लमेंट मध्ये हिंदी जनतेचे प्रतिनिधी असावेत . अशी मागणीही केली होती
त्यांनी आपल्या देशाचा आर्थिक स्थितीचे ही निरीक्षण केले व त्यांनी भारतीय जनतेला स्वतःचे उद्योग करण्याचे सुचविले या दृष्टिकोनातून त्यांनी स्वदेशी चा पुरस्कार केला . 12 जानेवारी 1872 रोजी त्यांनी स्वदेशी ची शपथ घेतली .
इतकेच नव्हे तर 1877 ला ते पांढरे शुभ्र देशी कपडे घालूनच दिल्ली दरबारात गेले होते . टिळक गांधी यांचा किती तरी वर्ष अगोदर त्यांनी स्वदेशी ची चळवळ सुरू केली अशा परीने स्वदेशी ची चळवळ सुरू करणारे ते पहिले होते .
लॉर्ड लितन ने केलेल्या व्हेरणकुलार प्रेस अॅक्ट ल विरोध केला .
या कायद्याच्या निषेधार्थ त्यांनी 29 मार्च 1878 रोजी इंदुप्रकश चे संपादक जनार्दन सुंदर्जी किर्तीकर यांचा अध्यक्षतेखाली मुंबई इलख्याचा वृत्तपत्र करांचे एक संमेलन भरविले
एवढेच नव्हे तर कोलकाता येथे भरलेल्या अशाच संमेलनात ते उपस्थित होते . काकांचा पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी पुण्यात 1871 ला पुण्यात ' स्त्री विचार वती ' नावाची सामाजिक सस्था स्थापन केली . या संस्थे मार्फत समाजातील जाती भेद दूर करण्यासाठी हळदी कुंका चा कार्यक्रम करीत असे यात सर्व प्रकार चा जातीचा स्त्रिया सहभागी होत असे .
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें