Vision mpsc
महाराष्ट्रातील कामगार चळवळी चा उदय
11 जुलै 1851 रोजी पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी सुरू झाली . मुंबई ( कुर्ला ) नानाभाई कावसाजी दावर यांनी केली .
टाटा यांनी नागपूर येथे एम्प्रेस मिल ची स्थापना केली .
1885 पर्यंत महाराष्ट्रात 73 कापड गिरण्या होत्या .
मुंबईतील कापड व्यवसायाचा विकासामुळे लांकॅशयर येथील कापडास उठाव मिळेनासा झाला . मुंबईतील कापड गिरण्यांची संख्या वाढू लागली .
भारतातील मालाचा कमी किमतीचा शोध घेताना असे लक्षात आले की इथल्या कामगारांचे कमी पगार , कामाच्या ठिकाणी अस्वच्छता , बालके व स्त्रियांना कमी मजुरी ही सर्व माहिती ब्रिटिश सरकारला समजली .व ब्रिटिशांनी भारतातील कामगारांसाठी कायदा करावा ही सूचना सरकारला देण्यात आली
व त्यानंतर मुंबईतील गिरणी मालकांनी स्वतःचा फायदा साठी "बॉम्बे मिल्स ऑनार्स असोसिएशन " ही संघटना स्थापन केली
मँचेस्टर चा वाढता दबाव व गिरणी मालकांचा सुचणे नुसतं कामगारांची पाहणी करण्यासाठी सरकारने मुंबई चे जिल्हा अधिकारी अबुर्थ नॉट यांचा अध्यक्षतेखाली 23 मार्च 1875 रोजी पाहिले फॅक्टरी कमिशन नियुक्त करण्यात आले .
या कमिशन मध्ये मंगलदास नाठुभाई , दिनशॉ पेटिट ,मोरारजी गोकुळदास हे गिरणी मालक होते .
कमिशन ने आपला अहवाल सरकारने ला सादर केला पण सरकार ने त्याला मंजुरी दिली नाही.
शोराबजी शापुरजी बंगाली यांचा नेतृत्वाखाली 1875 ला कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी कायदा करण्यात यावा अशी मागणी केली .
सार्वजनिक सभेने ही आवशक ते प्रयत्न केले .
याच काळात 1879 - 80 मध्ये मंदीची लाट आल्यामुळे कामगारांचे प्रचंड हाल होत होते . व वृत्तपत्राने ही कामगारांचा हाल अपेष्टा चे दर्शन घडवून आणले त्यामुळे पहिला फॅक्टरी अक्ट लॉर्ड रिपन यांचा काळात
पास झाला .
पण गिरणी मालकांचा दबावामुळे यामधील तरतुदी सौम्य व मर्यादित स्वरूपाचा होत्या . त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला . यातूनच मुंबई मध्ये कामगार चळवळीचा उदय झाला .
# कामगार ििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििि
# कामगार चळवळीचे जनक - नारायण मेघांनी लोखंडे
यांचा जन्म 1848 मध्ये ठाणे येथे झाला . त्यांचे मूळ गाव पुणे जिल्हा खेड तालुक्यातील कान्हेरसर हे होते .
त्यांनी 1870 पासून सामाजिक कार्याला सुरुवात केली .
" दीनबंधू " वृत्तपत्रातून त्यांनी कामगारांचे प्रश्न ,दुःख लिहण्यास सुरुवात केली .
' बॉम्बे मिल्स ओनार्स असोसिएशन ' कोणतेही नियम पाळत नसतं . त्यामुळे त्यांनी कामगारांची चळवळ हाती घेतली .
सरकारने 1881 ला फॅक्टरी ऍक्ट परित केला . त्यातील तरतुदीचा त्यांनी विरोध केला.
1884 मध्ये त्यांनी कामगारांचा हितासाठी " बॉम्बे मिल्स हॅण्ड असोसिएशन " ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली .
23 सप्टेंबर 1884 रोजी कामगारांची पहिली सभा मुंबईत परळ येथे घेतली .त्यावेळी चार हजार कामगार हजार होते .
फॅक्टरी कमिशन चे अध्यक्ष डबलू .बी . मुलक यांना कामगारांचा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
24 एप्रिल 1890 ला महालक्ष्मी रेस कोर्स मैदानावर दहा हजार कामगारांची सभा झाली . त्यावेळी कामगारांनी रविवार चा सुट्टीची मागणी केली .
10 जून 1890 रोजी गिरणी मालकांनी ही मागणी मान्य केली . व रविवार ची सुट्टी येथून सुरू झाली .
श्री . लोखंडे यांनी हिंदू - मुस्लिम दांग्याच्या वेळी महत्वपूर्ण कामगिरी केल्या बद्दल सरकारने त्यांना " रावबहादूर " ही पदवी दिली व त्यांना "जस्टिस ऑफ पीस " यांनी सम्मानित केले .
1897 ला प्लेग चा आजारामुळे त्यांचा मूर्त्यु झाला .
स्वतंत्र पूर्व कामगार चळवळी
पोस्ट खात्यातील कामगारांनी 1907 मध्ये
" बॉम्बे पोस्टल युनियन " ही संघटना स्थापन केली .
1909 मध्ये भिवाजी नारे यांनी सीताराम बोले व हरीचंद्र तलचेलकर यांचा मदतीने " कामगार हित्वर्धक सभा " या संघटनेची स्थापना केली . व कामगारांना शिक्षण व कायदेशीर सल्ला देण्याची सोय केली .
याच वेळी नारायण मल्हार जोशी यांनी गोपाळ देवधर ,नरेश आप्पाजी द्रविड यांचा मदतीने 1909 मध्ये
" सोशल सर्विस लीग " ची स्थापना केली .त्याद्वारे कामगारांचा सुधारणा घडवून आणण्याचं प्रयत्न केला .
बी.पी.वाडिया यांचा प्रयत्नातून 1918 मध्ये " मद्रास लेबर युनियन " 1920 मध्ये मजूर महाजन या कामगार संघटना उदयास आल्या.
1920 मध्ये अखिल भारतीय कामगार महासभा स्थापन झाली . ( AITUC)
1 डिसेंबर 1929 ला इंडियन ट्रडे युनियन ची स्थापना झाली .ज्याचे अध्यक्ष व्हि.ही. गिरी होते .
एल. एन.हरदास यांनी नागपूर मध्ये " मध्य प्रांत वरहाड बिडी कामगार संघ " ची 1 जानेवारी 1931 ला स्थापना केली .
ऑक्टोंबर 1937 मध्ये " संयुक्त खानदेश मजूर फेडरेशन " ची स्थापना झाली .
1938 मध्ये " राष्ट्रीय कामगार संघ" ची स्थापना झाली .
11 एप्रिल 1939 रोजी ब्रिटिश गिरणी चा 7 महिन्याचा
संप श्रीपाद अमृत डांगे यांचा नेतृत्वाखाली झाला.
सरदार वल्लभ भाई पटेल यांचा नेतृत्वाखाली मुंबई येथे
इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस ( INTUC ) ची स्थापना झाली .
या संघटनेला शाह देण्यासाठी साम्यवाद यांनी " हिंदू मजूर सभा " 1948 मध्ये स्थापन केली.
14 जानेवारी 1959 रोजी समितीच्या नेत्यांनी बैठकीत मुंबईतील सर्व गिरणी कामगारांची एक युनियन तयार करण्याचा निर्णय घेतला . व तिला " मुंबई गिरणी कामगार युनियन " असे नाव देण्यात आले .
कामगार आघाडी - डॉ . दत्ता सामंत
महाराष्ट्र लेबर युनियन - राजन नायर
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें