Vision mpsc
दुसऱ्या महायुध्दाच्या समाप्तीनंतर ब्रिटिश सरकार कुमकुवत झाले होते त्यांना आत्ता भरतवा राज्य करणे अशक्य वाटू लागले . म्हणून त्यांनी लवकरात लवकर भारताला स्वतंत्र देण्याचे घोषित केले .
1). राजाजी योजना ::
ही योजना. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी मांडली ही योजना मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा यांची तडजोड करून आणणारी एक योजना होती . गांधीजी नी ती मान्य केली .
प्रमुख तरतुदी ::
1) घटना निर्मिती पूर्वी राष्ट्र सभा व लीग यांचे हंगामी केंद्रीय सरकार स्थापन व्हावे.
2) युद्ध समाप्तीनंतर मुस्लिम बहुसंख्य प्रांताचा सीमा निश्चित करून तेथील लोकांत सार्वमत घावे की तुम्हाला भारतात राहायचे की पाकिस्तानात
सर्वमतचा मुद्यमुळे बा . जिनांनी ही योजना फेटाळली
#व्हेवेल योजन #
14 जून 1945 ला व्हाईसरॉय लॉर्ड व्हेवेल यांनी एक त्यांची योजना मांडली .
व्हॉईस रॉय चा कार्यकारी मंडळात व्हाईसरॉय व सरसेनापती ही दोन ब्रिटिश तर उर्वरित सर्व भारतीय सदस्य असतील .
या मंडळात हिंदू - मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील.
सरक्षण खाते सोडून इतर सर्व खाती भारतीयांना सोपवण्यात येतील .
25 जून 1945 ला सिमला येथे सर्व पक्षीय चर्चा झाली
कार्यकारी मंडळात मुस्लिम सदस्य नेमण्याचा अधिकार मुस्लिम लीग ला असावा या जिना यांचा मतामुळे ही योजना फेटाळली.
# त्रीमंत्री योजना # ( कॅबिनेट मिशन )
कॅबिनेट मिशन चे सदस्य : सर पथिक लॉरेन्स, स्ताफर्ड क्रीपस , ए . व्हीं अलेक्झांडर
जुलै 1945 मध्ये इंग्लंड मधील निवडणुकात हुजुर पक्ष पराभूत होवून मजूर पक्षाचे क्लेमेंट अटली हे पंतप्रधान झाले .
15 मार्च 1946 ;: भारताला लवकर स्वतंत्र देण्याची घोषणा एटली यांनी पार्लमेंट मध्ये केली .
त्यानंतर 24 मार्च 1946 ला पुढील वाटचालीसाठी अॅटली यांनी एक शिष्ट मंडळ भारतात पाठविले .
भारतात येवून कॅबिनेट मिशन चा सदस्यांनी मुस्लिम लीग ,राष्ट्रीय सभा व इतर पक्षांचा 472 नेत्यांचा मुलाखती घेतल्या .
16 मे 1946 ला त्रिमांत्री योजना जाहीर झाली .
प्रमुख तरतुदी
1 ) भारतातील संस्थाने व प्रांत यांचे मिळून संघराज्य स्थापन करावे . नव्या संघराज्याची संविधान निर्मिती साठी लोकसंख्येच आधारावर सदस्य निवडावे.
2 ) प्रशासकीय सोयीसाठी भारतातील प्रांताची तीन भागात विभागणी करण्यात यावी
1) हिंदू बहुसंख्य भाग मद्रास,मुंबई,बिहार,उत्तरप्रदेश,मध्यप्रांत व ओरिषा विभाग
2) मुस्लिम बहुसंख्य असा पंजाब ,वायव्य सरहद्द प्रांत ,सिंध व बलुचिस्तान
3) बंगाल आणि आसाम यांचा वेगळा गट असावा
वरील प्रत्येक प्रांतातील प्रतिनिधी आपली वेगळी घटना बनवतील त्यावरून संघ राज्याची घटना बनवण्यात येईल.
भारतातील प्रमुख पक्षाचे हंगामी सरकार स्थापन करण्यात येईल व संविधान निर्मिती होई पर्यंत ते सत्तेवर राहील .
त्रिमंत्री योजनेचे फलित #
1) या योजनेत अनेक उणीवा असून सुध्धा प्रथमच घटना निर्मिती ची संधी मिळाल्याने राष्ट्रीय सभेने ही योजना मान्य केली .
जुलै 1946 घटना निर्मिती साठी निवडणुका झाल्या व यात राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले .
2 सप्टेंबर 1946 ला पंडित नेहरू यांचा अध्यक्षतेखाली हंगामी सरकार ची स्थापना झाली .
या निवडणुकीनंतर मुस्लिम लीग ने ही योजना फेटाळली करण यात स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची तरतूद केली नव्हती
16 अगस्त 1946 हा दिवस मुस्लिम लीग ने बा .जिना यांचा आग्रहावरून ' प्रत्यक्ष कृतिदिन ' म्हणून पाळला.
या दिवशी बंगाल मधील नौखली येथे जातीय दंगली झाल्या गांधीजी नी त्या शामविण्याचा प्रयत्न केला .
प्रधानमंत्री आटली यांनी घोषणा केली 20 फेबु. 1947 रोजी घोषणा केली की जून 1948 चा पूर्वी भारतात सातांतर. घडवून येईल .
#माऊंटबॅटन योजना #
3 जून 1947
आपल्या घोषणेचा अमलबजावणीसाठी क्लेमेंट आटली यांनी भारताचे नवे व्हाईसरॉय म्हणून माऊंटबॅटन यांना मार्च 1947 ला भारतात पाठविले .
यातील तरतुदी
1) फाळणी नंतर भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण होतील.
2) पंजाब व बंगाल चे विभाजन तेथील सदस्यांचा निर्णयानुसार होईल.
3) वायव्य सरहद्द प्रांत ,बलुचिस्तान व आसाम मधील सिल्हेत जिल्ह्यात सार्वमत घेण्यात येईल.
4) सिंध प्रांताचा विलीनीकरण बाबत तेथील विधिमंडळाने निर्णय घ्यावा .
5) 1947 नंतर ब्रिटिश भारत सोडून गेल्यावर भारत व पाकिस्तान यांच्यातील सीमा निश्चित करावी .
6 ) संस्थानिकांना राज्यात सामील होण्याचे किंवा स्वतंत्र राहण्याचे अधिकार देण्यात आले .
माऊंटबॅटन योजनेवर आधारित हा कायदा ब्रिटिश पार्लमेंट ने 18 जुलै 1947 ला मंजूर केला .
15 अगस्त 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे तयार होतील . ब्रिटन चा राजाचे भारताचा बादशहा हे पड संपुष्टात येईल .
संस्थनावरची ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात येईल व त्यांना भारत अथवा पाकिस्तान मध्ये जाण्या चा किंवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार असेल.
त्रीमंत्रि योजने नुसतं जुलै 1946 मध्ये संविधान सभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या .
अप्रत्यक्ष पद्धतीने ह्या निवडणुका घेण्यात अल्ल्या व प्रत्येक 10 लाख लोकांमध्ये एक सदस्य निवडला गेला .
ब्रिटिश भारताला एकूण 389 सदस्य देण्यात आले होते
292 हे ब्रिटिश सदस्य प्रंतामधून तर 4 सदस्य चीफ कमिशनर चा प्रंतामधुन दिले गेले .
व 93 सदस्य संस्थानिक यांना देण्यात आले संस्थानिक त्यांचे सदस्य नामनिर्देशित करणार होते .
या निवडणुकीसाठी 3 गट तयार करण्यात आले .
शीख - 4 उमेदवार
मुस्लिम - 79 उमेदवार
साधारण - 213 उमेदवार
एकूण 296 उमेदवार
या सदस्यांची निवडणूक 1935 चा कायदा द्वारे निवडून आलेल्या प्रांतिक विधी मंडळाच्या सदस्या. सारखी झाली .
निवडणुकीची पद्धत -. एकल संक्रमनिय प्रमाणशीर प्रतिनिधइतवाची पद्धत ( अप्रतक्ष पद्धत )
संविधान सभेस अंशत : निवडणुकीद्वारे निवडलेली संस्था
संविधान सभेत सर्व गटांना प्रतिनिधी तव देण्यात आले
सर्व गट
1 ) अँग्लो इंडियन - फ्रॅंक अँथोनी
2 ) गोरखा - आली बहादुर
3 ) पारसी - एच पी मोदी
4 ) ख्रिश्चन - एच सी मुखर्जी
4 प्रांत : 1 ) दिल्ली 2 ) अजमेर - मारवाड 3 ) कूर्ग
4 ) बलुचिस्तान
11 प्रांत कडून : मद्रास , बॉम्बे , संयुक्त प्रांत , बिहार , मध्यप्रांत , ओरिसा , पंजाब , nwfp , सिंध , बंगाल , आसाम
विजयी उमेदवार
मुस्लिम लीग - 73
काँग्रेस - 208
उर्वरित - 15
अपक्ष 8 उमेदवार व प्रत्येक पक्षाचे 7 असे निवडून आलेत
सर्वाधिक प्रांत चे
मध्य प्रांत - 55
मद्रास - 49
बिहार - 36
बॉम्बे - 21
संस्थानिकांचे
म्हैसूर - 7
त्रावणकोर - 6
संविधान सभेत अनेक समित्या होत्या . त्यात महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती
या समिती मध्ये 7 सदस्य होते . डॉ . बी. आर . आंबेडकर या समितीचे अध्यक्ष होते .
अ. क. अय्यर ( मद्रास प्रांताचे वकील , अपक्ष)
एन जी अय्यंगार ( जम्मू काश्मीर चे पंतप्रधान काँग्रेस)
स . एम. सदुल्लाह ( मुस्लिम लीग चे , आसाम चे pm)
डॉ .के. एम.मुंशी ( बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर,काँग्रेस)
एन.माधव राव ( बी . एल.मित्तल चा जागी )
टी. टी.कृष्नमाचारी ( डी.पी. खैतन चा जागी )
इत्यादी या समिती चे सदस्य होते .
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें