psi dp chavan sir स्थान ,विस्तार व सीमा

Vision mpsc

 महाराष्ट्राचे स्थान भारताचा पश्चिम भागात आहे व अरबी समुद्रास लागून आहे 

महाराष्ट्राचा अक्षवृतिय विस्तार 15 अंश 8 ऊ ते 22 अंश 1 ऊ असा आहे 
रेखावृतीय विस्तार 72 अंश 36 पू ते 80 अंश 54 पू असा आहे 

महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी 700 किमी आहे व पूर्व पश्चिम लांबी 800 किमी आहे 

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 307713 चौ की मी आहे ते भारताचा एकूण क्षेत्रफळाच्या 9.36 टक्के आहे महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील 3 रा क्रमांक लागतो 



     महाराष्ट्र राजकीय स्वरूप 
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी 26 जिल्हे व 235 तालुके आणि 4 पप्रशासकीय विभाग होते 

सद्या .महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे व 358 तालुके आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत 

प्रशासकीय विभाग : कोंकण यामध्ये 7 जिल्हे व 50 तालुके आहेत 

औरंगाबाद विभाग यामध्ये 8 जिल्हे व 76 तालुके आहेत

पुणे विभाग यामध्ये 5 जिल्हे व 58 तालुके आहेत 

नाशिक विभाग यामध्ये 5 जिल्हे व 54 तालुके आहेत

अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे व 56 तालुके आहेत 

नागपूर विभाग मध्ये 6 जिल्हे व 64 तालुके आहेत 


महाराष्ट्रामध्ये एकूण 27 महानगरपालिका आहेत व 07 कटक मंडळे आहेत 
30 मे 2010 रोजी वसई विरार ठाणे जिल्हा ही 23 वी महानगर पालिका अस्तित्वात आली 
2011 ला परभणी ,लातूर व चंद्रपूर या तीन नवीन महानगर पालिका झाल्या व 2016 ला पनवेल ही 27 वी महानगर पालिका अस्तित्वात आली आहे

महाराष्ट्रात सध्या 226 नगर परिषदा आहेत व 05 नगर पंचायती आहेत 335 पंचायत समित्या आहेत 

नगर पंचायती 
1 ) शिर्डी जी .नगर 
2) कणकवली जी .सिंधुदुर्ग 
3) दापोली जी.रत्नागिरी 
4) केज जी बीड 
5) मलकापूर जी .सातारा

महाराष्ट्रात एकूण 07 कटक मंडळे आहेत देहू,खडकी,पुणे कॅम्प, कामठी ,देवळाली ,भिगर,औरंगाबाद 

भारतामध्ये एकूण 62 कटक मंडळे आहेत 

टिप्पणियाँ